मुंबईत कोरोनाचा हाहाःकार अन् अंधेरीत डॉक्टरांची पदे रिक्तच

18 Sep 2020 19:48:30
corona_1  H x W
 
मुंबई : कोरोनाचा कहर कमी न होता तो दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य सेवकांवर याचा मोठा ताण पडत आहे. त्यामुळे अंधेरी परिसरातील डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष, क्र ७१ चे भाजप नगरसेवक अनिष मकवानी यांनी केली आहे.
 
 
 
कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून गेली ५ ते ६ महिने वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींवर मोठा ताण आला आहे. परंतु डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यासाठी सरकार पावले उचलत नाही. अंधेरी परिसरातही डॉक्टर आणि इतर पदांची वानवा असून त्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत अशी मागणी मकवानी यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे. अंधेरी परिसरातील नागरिकांना कोरोनाच्या संकट काळात अनेक समस्याना सामोरे जावे लागले.
 
 
 
डॉक्टर कमी असल्याने कोविड-१९च्या रुग्णांना त्रास सहन करावा लागला. आता कोरोनाचा कहर कमी झाला असे वाटत असतानाच तो पुन्हा वाढत असल्याने धोका कायम आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने डॉक्टर आणि इतर रिक्त कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भारावीत अशी मागणी आरोग्य विभागाकडे पत्र पाठवून केली आहे. याची अंमलबजावणी झाली तर या परिसरातील लोकांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.


Powered By Sangraha 9.0