पुन्हा हाक...एक मराठा लाख मराठा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2020
Total Views |

reservation_1  



मुंबई :
मराठा आरक्षणासाठी राज्याच्या विविध भागात मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन सुरु केले आहे. कोल्हापुरात मराठा आंदोलक मुंबई आणि पुण्याला येणारा दूध पुरवठा रोखणार आहेत, तर पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरातही मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. पुण्या-मुंबईकडे जाणारा दूध पुरवठा आंदोलक रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे. गोकुळ दूध संघाच्या गोकुळ शिरगाव कार्यालयाबाहेर टॅंकर अडवणार आहेत. गोकुळमधून रोज पुण्यासाठी १५ टँकर, तर मुंबईसाठी ३५ टँकर दूधपुरवठा होतो. हा सर्व दूध पुरवठा रोखण्याचा प्रयत्न आंदोलक करणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गोकुळ संघ कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.



औरंगाबादमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना आंदोलनकानी घेराव घातला.जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा दिल्या. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तर दुसरीकडे, नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या बंगल्याजवळ मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मराठा आंदोलकांच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला.



“आम्ही सरकारसोबत आहोत, यामध्ये कुठलंही राजकारण आणणार नाही,” असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर सांगितले. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिली. त्यानंतर सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.याचबरोबर राज्यात तब्बल १२ हजारांहून अधिक पदांसाठी पोलीस भरती करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीतही या प्रस्तावाला मान्यता मिळाली. मात्र एकीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा कोर्टात प्रलंबित असताना दुसरीकडे राज्य सरकारने पोलीस भरती करणे योग्य नाही, सरकारचा हा निर्णय मराठा समाजाला चिथावणी देण्यासारखा आहे. त्यामुळे पोलीस भरती पुढे ढकलावी अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@