संग्रहालयाचे नाव बदलल्यावर लिबरलांनी उचलली मुघलांची तळी

    दिनांक  17-Sep-2020 18:13:10
|
Sagarika Ghosh_1 &nb


नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरूंची स्वयंघोषित चाहती असलेल्या पत्रकार सागरीका घोष हिने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यातून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यंदा त्यांनी अकबरसह अन्य मुघल शासकांची बाजू घेतली आहे. नुकतेच योगी आदित्यनाथ सरकारने मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची घोषणा केली आहेय त्यावरून घोष यांनी हिंदूत्ववादी नेत्यांविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे. सोबतच मुघल शासक कसे योग्य, हे पटवून देण्याचा सपाटाच त्यांनी लावला आहे.
 

 
 
मुघल शासक हे राजपूत मातांचे संताने आहेत. मुघल साम्राज्यात समानतेला महत्व देण्यात आले होते. घोष यांच्या मते, मुघल संग्रहालयाचे नाव बदलणे म्हणजे हिंदूत्ववादी नेत्यांचा इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टीकोन चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सरकार हीन विचारांचे शिकार बनल्याने हा निर्णय घेतल्याचे घोष यांचे मत आहे. इतके म्हणत त्यांनी गरळ ओकणे थांबवले नाही. याऊलट मुघल किती महान होते हे सांगण्यासाठी पुरावे दाखवण्याचा प्रकार सुरू केला.
 

 
  
अकबराला महान म्हणत त्या म्हणतात, "अकबर एक महान आणि सच्चा धर्मनिरपेक्ष शासक होता. तो प्रत्येक दिवशी गंगा जल सेवन करत होता." अकबराचे दोन महाल होते एक दिल्ली आणि दुसरा आग्रा यातील यमुना नदी तीरावर असलेले महाल मग अकबर गंगाजल कुठून सेवन करत होता याचे उत्तर घोष यांनी दिले नाही. त्यानंतर प्रशासनिक सुधारणा आणणारा शासक म्हणून अकबराला पाहिले जाते, असे त्या म्हणतात.
 

 
 
 
नेटफ्लिक्सने मुघल शासकांच्या महानतेवर एक वेब सिरीज बनवायला हवी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. सागरिका घोष यांनी एक बीबीसीची डॉक्युमेंटरी ट्विट करत मुघलांचे गुणगाण गायले आहेत. भारतावर दोनशे वर्षे राज्य करणाऱ्या मुघल शासकांचा उल्लेख या डॉक्युमेंटरीत आहे. अकबर किती महान होता हे सांगताना त्या थकल्या नाहीत, आपल्या ट्विटद्वारे सतत उल्लेख केला. यापूर्वी पंडित जवाहलाल नेहरूंसाठी घोष यांनी अशीच स्तुतीसुमने उजळली होती. भारताला गुलाम बनवणाऱ्या मुघलांप्रति घोष यांना जास्तच सद्भावना आहेत. हे त्यांच्या ट्विटद्वारे दिसून येते.
 
 
 
मुघलांची प्रतिमा सकारात्मक करण्याचा प्रयत्न बऱ्याचदा केला जातो. स्वतःला लिबरल म्हणवणाऱ्या या पत्रकार मुघलांचे गोडवे गायले जातात. अकबर हिंदू स्त्रीयांशी विवाह करत होता, त्याला कथित स्वरुपात धर्मनिरपेक्ष बनवण्याचा प्रयत्न केला जातो. अर्थात हा निकाह अकबर किंवा अन्य मुघल प्रेम किंवा चांगल्या भावनेने मुळीच करत नसत. अकबराने हिंदू स्त्रीयांशी विवाह केला मात्र, त्याची जी मुले हिंदूंप्रमाणे वाढली त्यांचा इतिहासच पुसून टाकण्यात आला. 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.