प्रवीण दरेकर यांच्याविरोधात सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2020
Total Views |

pravin darekar_1 &nb



मुंबई :
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायन रुग्णालयासमोर केलेल्या आंदोलनामुळे दरेकरांवर ही कारवाई करण्यात आली आहे. अंकुश सुरवडे या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याप्रकरणात भाजपने सायन रुग्णालयाबाहेर



दरम्यान, अंकुशचा मृतदेह शवागारात पाठविण्यात आला. दोन तासानंतर नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेले असता अंकुशचा मृतदेह चुकुन दुसऱ्याला देण्यात आला व त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. सायन रुग्णालयाच्या या संशयास्पद काराभाराविरुध्द विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मंगळवारी सायन रुग्णालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले होते. याप्रसंगी भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, पालिकेचे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, नगरसेवक भालचंद्र शिरसाट, नगरसेविका राजश्री शिरवाडकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर आदी उपस्थित होते. तसेच सुरवडे कुटुंबीयही उपस्थित होते.


अंकुश सुरवडे प्रकरणात सायन रुग्णालयाकडून निष्काळजीपणा व हलगर्जीपणा झाल्याचे पालिका आयुक्तांनी मान्य केले. त्यामुळे या प्रकरणात केवळ कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करुन चालणार नाही, तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी प्रवीण दरेकरांनी केली होती. त्यामुळे सुरवडे प्रकरणात एक चौकशी समिती नेमण्याची मागणी पालिका आयुक्तांनी मान्य केली आहे. या समितीमध्ये आरोग्य खात्यातील तज्ञ व पोलिस खात्यातील अधिकारी यांचा समावेश असेल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. पण या समितीमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक असावा अशी विनंतीही आम्ही यावेळी आयुक्तांकडे केल्याची माहिती दरेकर यांनी यावेळी दिली.
@@AUTHORINFO_V1@@