मुंबईकरांनो सावध व्हा ! आढळले २३५२ रुग्ण

    दिनांक  16-Sep-2020 22:14:16
|
Corona_1  H x W


मुंबई : मुंबईत मंगळवारी रुग्णसंख्येत घट झाली असली तरी आज बुधवारी पुन्हा वाढ झाली. आज २,३५२ रुग्ण आढळले. ही मुंबईच्या दृष्टीने चिंताजनक बाब मानली जात आहे. मुंबई महापालिकेनेही हा गंभीर इशारा मानत यंत्रणा कामाला लावली आहे. मुंबईत बुधवारी दिवसभरात एकूण २,३५२ रुग्ण आढळले. त्यामुळेच कोरोनाबाधितांची एकूण संख्या १,७५,८८६ झाली आहे. आज १,५०० रुग्ण बरे झाले. त्यामुळे बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या १,३५,५६६ झाली आहे. दुर्दैवाने आज ५० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या ८,२७७ झाली आहे. सध्या विविध रुग्णालयात ३१,६७८ रुग्ण उपचार घेत आहेत.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.