मराठा आंदोलनाची धग पेटणार : मुंबईचा दूधपुरवठा रोखणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2020
Total Views |
Maratha_1  H x
 
 

सकल मराठा समाजाचे नेते दिलीप पाटील यांची घोषणा

 
 
 
मुंबई : मराठा तरुणांना न्याय मिळावा, आरक्षणाचा तिढा लवकर सुटावा या मागणीसाठी आता सकल मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आता आंदोलनाची ठिणगी पाडावीच लागेल, असे मत सकल मराठा समाजाचे नेते दिलीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. त्यासाठी मुंबईचा दूध पुरवठा रोखून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
 
 
 
मुंबई महानगर आणि पुण्यासारख्या शहरात होणारा दुध पुरवठा रोखून निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाविषयक भूमीका मांडताना कमी पडल्याने आरक्षणावर स्थगिती आणण्यात आली आहे. त्यामुळे शैक्षणिक प्रवेशात विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होत नाही. तसेच राज्य सरकारने सुरू केलेल्या विविध भरत्यांमध्येही हे आरक्षण लागू होत नाही, त्यामुळे या सर्व प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी आता मराठा आंदोलकांनी केली आहे. उद्याच्या आंदोलनानंतरही सरकारला जाग आली नाही तर महाराष्ट्रभर आंदोलन पेटवू, असा इशारा देण्यात आला आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@