कांदा निर्यातबंदी मागे घ्या! : फडणवीसांचे केंद्राला पत्र

16 Sep 2020 16:14:25
Devendra Fadanvis_1 
 
 
मुंबई : कांदा निर्यात बंदी हटवण्यासाठी आता राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे मागणी केली आहे. या संदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांच्याशी फोनवर चर्चाही केली आहे. या संदर्भात गोयल यांच्याशी विस्तृत संवाद झाला आहे आणि लवकरच यावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे.


 
महाराष्ट्रातील कांद्याला परदेशात मागणी आहे. उत्तम दर्जाच्या पिकाला निर्यातीमुळे भावही तितकाच मिळत असतो. सरकारने निर्यातबंदी केल्यानंतर अनेक बंदरांवर लाखो टन कांदा पडून आहे. ही बंदी उठवली नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, अशी भीतीही फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0