राज्यात एकाच दिवशी आंदोलन नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2020
Total Views |

maratha kranti morcha_1&n



मुंबई :
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभरातील आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात आले आहे.


मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण राज्यात एकाच दिवशी आंदोलन होणार नाही. विविध जिल्ह्यात विविध दिवशी आंदोलन होतील. तसेच बंद पुकारले जातील. येत्या २१ सप्टेंबरला सोलापुरात जिल्हा बंद आणि आंदोलनाची हाक दिली आहे. तर मुंबईत २० सप्टेंबरला ठिकठिकाणी ठिय्या आंदोलनाची शक्यता आहे. मराठा आरक्षणप्रश्नी २३ सप्टेंबरला कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन केले जाणार आहे, असे सांगितले होते. यात विविध क्षेत्रातली सर्व तज्ञ मंडळी एकत्र येतील. या परिषदेत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार, राज्यभरातून मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते, पदाधिकारी परिषदेत सहभागी होणार आहे. तसेच येत्या १७ सप्टेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन केली जाणार आहेत.


दरम्यान, मराठा आरक्षण कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. घटनापीठाच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करता येणार नाही. मराठा आरक्षणाअंतर्गत २०२० आणि २०२१ मध्ये वैद्यकीय प्रवेश प्रकिया आणि नोकरी भरती करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. घटनापीठाच्या अंतिम निकालानंतरच मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारला करता येणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@