रशियाची लस येणार भारतात ; ‘या’ कंपनीसोबत केला करार

16 Sep 2020 20:29:39

COVID Vaccine _1 &nb
 
 
नवी दिल्ली : जगभरामध्ये कोरोनाच्या लसीकरिता सर्वात पहिले रशियाच्या 'स्पुटनिक व्ही’ला मान्यता देण्यात आली. यानंतर आता भारतीयांसाठी एका दिलासादायक बातमी म्हणजे रशियाची ही लस आता भारतामध्ये दाखल होणार आहे. भारताच्या डॉ. रेड्डीज लॅबोरटरीज कंपनीचा रशियन डायरेक्ट इन्व्हेसमेंट फंडशी करार झाला आहे. या करारानुसार ‘स्पुटनिक व्ही’ लशीच्या चाचणी आणि वितरणासाठी १० कोटी डोस भारताला देण्यात येणार आहेत.
 
 
भारतात रशियन लशीचे उत्पादन आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली होती. त्याच्या आठवड्याभरानंतरच डॉ. रेड्डीज कंपनीने हा करार केला. डॉ. रेड्डीज लॅबचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जी.व्ही. प्रसाद यांनी सांगितले की, “भारतात रशियाची लस आणण्यासाठी आरडीआयएफ सह भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होतो आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीमधून आशादायक असे परिणाम पाहायला मिळाले आहेत आणि या लशीचे आम्ही भारतात तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करणार आहोत.”
 
 
Powered By Sangraha 9.0