जयाजी आणि त्यांच्या इंडस्ट्रीने कोणते ‘ताट’ दिले?

    दिनांक  16-Sep-2020 18:22:52
|

kangana_1  H x

संतप्त कंगनाचा जया बच्चन यांना सवाल!
बॉलीवुड आणि ड्रग्स वादावर जया बच्चन यांनी संसंदेच्या पावसाळी अधिवेशनात काही प्रश्न उपस्थित केले होते. जया बच्चन म्हणाल्या होत्या की, 'काही लोकांमुळे आपण संपूर्ण इंडस्ट्रीची प्रतिमा खराब करू शकत नाही. मला लाज वाटते की काल चित्रपटसृष्टीतील लोकसभेतील आमच्या एका सदस्याने त्याविरूद्ध भाषण केले. हे लाजीरवाणे आहे. आपण ज्या ताटात जेवतो त्यातच छिद्र करु शकत नाही.' जया बच्चन यांचे हे विधान सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलीवूडसोबत कंगनाचा असलेल्या विवाद आणि भाजप खासदार रवी किशनच्या लोकसभेत दिलेल्या वक्तव्याशी जोडून पाहिले जात आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.