जयाजी आणि त्यांच्या इंडस्ट्रीने कोणते ‘ताट’ दिले?

16 Sep 2020 18:22:52

kangana_1  H x

संतप्त कंगनाचा जया बच्चन यांना सवाल!

मुंबई : समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत बॉलिवूडमधील ड्रग्जच्या मुद्यावर विधान केले. यावरुन सध्या वाद वाढत आहेत. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने मुंबईत अमिताभ बच्चन यांच्या घराची सुरक्षा वाढवली. दुसरीकडे अभिनेत्री कंगना राणावतने सलग दुसर्‍या दिवशी जया बच्चन यांच्यावर पलटवार केला आहे. कंगनाने ट्विट केले की, 'कोणते ताट दिले आहे जयाजी आणि त्यांच्या इंडस्ट्रीने? मी या इंडस्ट्रीला फॅमिनिज्म शिकवले. हे ताट देशभक्ती, नारी प्रधान चित्रपटांने सजवले. हे माझे ताट आहे जयाची तुमचे नाही.' असे म्हणत तिने जया बच्चन यांना प्रत्त्युत्तर दिले आहे.








बॉलीवुड आणि ड्रग्स वादावर जया बच्चन यांनी संसंदेच्या पावसाळी अधिवेशनात काही प्रश्न उपस्थित केले होते. जया बच्चन म्हणाल्या होत्या की, 'काही लोकांमुळे आपण संपूर्ण इंडस्ट्रीची प्रतिमा खराब करू शकत नाही. मला लाज वाटते की काल चित्रपटसृष्टीतील लोकसभेतील आमच्या एका सदस्याने त्याविरूद्ध भाषण केले. हे लाजीरवाणे आहे. आपण ज्या ताटात जेवतो त्यातच छिद्र करु शकत नाही.' जया बच्चन यांचे हे विधान सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलीवूडसोबत कंगनाचा असलेल्या विवाद आणि भाजप खासदार रवी किशनच्या लोकसभेत दिलेल्या वक्तव्याशी जोडून पाहिले जात आहे.





Powered By Sangraha 9.0