शो बिझनेस विषारी ! कंगनाचा पुन्हा बॉलिवूडवर निशाणा

    दिनांक  16-Sep-2020 11:41:58
|

kangana_1  H xमनाली :
बॉलीवूडमधील ड्रग्स माफिया आणि सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणावरून कंगनाने महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलिसांवर वारंवार टीका केली. घरी परतल्यानंतर कंगनाने बॉलिवूडला पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे. हा शो बिझनेस विषारी आहे अशी टीका तिने केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये कंगना म्हणाली की, शो बिझनेस पूर्णपणे विषारी आहे. प्रकाशाचा झगमगाट आणि कॅमेऱ्याचे हे जग कुणाचेही जीवन चालवण्याचे आणि आभासी वास्तवावर विश्वास ठेवायला देते, याची जगाला जाणीव करूव देते. या आभासीपणाची जाणीव होण्यासाठा अध्यात्मिकदृष्ट्या भक्कम असणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना राणौत आणि शिवसेनेमध्ये जोरदार आरोपप्रत्यारोप होत आहेत. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून कंगना आणि शिवसेनेमध्ये सुरू झालेले शाब्दिक युद्धा टोकाला पोहोचले होते. तसेच यादरम्यान कंगनाच्या कार्यालयातील बांधकामावर मुंबई महानगरपालिकेने बुलडोजर चालवला होता.


सोशल मीडियावरुन ती बिनधास्तपणे आपली मुद्दे मांडत असते.कंगना राणौतनं बॉलिवूड महानायक बिग बी यांची पत्नी खासदार जया बच्चन यांच्या टीकेला आक्रमक उत्तर दिलं आहे. राज्यसभेत मंगळवारी जया बच्चन यांनी नाव न घेता कंगनावर निशाणा साधला होता.याबाबत कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ''जया जी, तुम्ही तेव्हाही असंच बोलला असतात का जर माझ्या जागी तुमची मुलगी श्वेताला टीएनेजमध्ये मारहाण झाली असती, ड्रग्स दिलं गेले असतं आणि छेडछाड केली असती? तुम्ही त्यावेळीही हे बोलला असतात का जेव्हा अभिषेक बच्चनला त्रास दिला जात असता आणि एके दिवशी तो फासावर लटकलेला दिसला असता? आमच्याबद्दलही सहानुभूती दाखवा.''
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.