'युवराजाच्या हट्टापायी महापालिकेत 'मराठी'चा गेम'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2020
Total Views |

bjp vs shivsena_1 &n




मुंबई :
मुंबई महापालिकेत मराठी महिला अधिकाऱ्याची सेवाज्येष्ठता डावलून अमराठी अधिकाऱ्याची चिटणीसपदी नियुक्ती केल्याने मराठी माणसाचा बेगडी आणि सोयीस्कर पुळका दाखवणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा चेहरा उघड झाल्याची टीका विरोधी पक्ष भाजपने केली आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. ते म्हणतात, "युवराजाच्या हट्टा लपायी महापालिकेत 'मराठी'चा गेम.शुभांगी सावंत यांच्यासह दोन सीनियर मराठी अधिकाऱ्यांचा ज्येष्ठता क्रम डावलून संगीता शर्मा यांच्या गळ्यात महापालिका चिटणीसपदाची माळ. मराठी माणसाचा बेगडी आणि सोयीस्कर पुळका दाखवणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा चेहरा उघड" झाला असल्याची टीका त्यांनी शिवसेनेवर केली. दरम्यान, पालिकेच्या चिटणीस विभागातील चिटणीस विनीत चव्हाण या ३१ ऑगस्टला सेवानिवृत्त झाल्या. त्यामुळे या महत्त्वाच्या पदावर सेवाज्येष्ठतेनुसार ज्येष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती होणे अपेक्षित आहे.




उपचिटणीस शुभांगी सावंत या पदासाठी ज्येष्ठ अधिकारी आहेत. सावंत यांच्यासोबत उप चिटणीस संगीता शर्मा या ही या पदासाठी इच्छुक आहेत. शर्मा या सावंत यांच्यापेक्षा कनिष्ठ असल्या, तरी शिवसेनेने शर्मा यांना चिटणीस पदावर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. शुभांगी सावंत यांना एक जून २०१८ रोजी, तर संगीता शर्मा यांना एक नोव्हेंबर २०१८ मध्ये उप चिटणीसपदी बढती मिळाली. त्यामुळे सावंत या शर्मा यांच्यापेक्षा पाच महिने वरिष्ठ आहेत. नियमानुसार सावंत यांची चिटणीसपदी बढती व्हायला हवी, असे चिटणीस विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. शर्मा यांना तांत्रिकदृष्ट्या चिटणीसपदी नियुक्ती करणे शक्य नसल्यामुळे थेट शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याकडून पालिका आयुक्तांवर दबाव आणला गेल्याचेही बोलले जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@