शीव रुग्णालयात मृतदेह अदलाबदल : भाजपतर्फे आंदोलनाचा इशारा

    दिनांक  15-Sep-2020 18:25:56
|
Pravin Darekar_1 &nb
 
 
 
 
मुंबई : शीव रुग्णालयात कोरोना रुग्ण आणि अपघात झाल्यानंतर उपचार घेत असलेला तरुण अंकुश यांच्या मृतदेह अदलाबदली प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपने आंदोलन केले. रुग्णाची अदलाबदली झाली हे रुग्णालयाने मान्य केले तरीही रुग्णाची किडणी चोरीला गेली, असा आरोप घरच्यांनी केली आहे. या प्रकरणी मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा आणि अन्य नेत्यांनी शीव रुग्णालयाबाहेर आंदोलन करत सरकारला धारेवर धरले. यावेळी स्थानिक आमदार कॅप्टन तमिळ सेलवनही उपस्थित होते.हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. दरम्यान, अशा किरकोळ कारवाया करणारी मुंबई महापालिका बड्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा कधी उगारणार, असा प्रश्न दरेकर यांनी विचारला आहे. या प्रकरणाची दखल घेतली नाही तरा मुंबईभर आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान, पोलीसांनी मध्यस्थी करत आंदोलन मागे घेण्याची मागणी केली. मात्र, कारवाई होईपर्यंत शांत बसणार नाही, अशी भूमिका दरेकर आणि मुंबई भाजपच्या नेत्यांनी घेतली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.