जय जिजाऊ, जय शिवराय! ; योगी सरकारच्या निर्णयाचे स्वागत

15 Sep 2020 09:55:56

yogi adityanath_1 &n


आग्रा :
अलाहाबादचे नामांतर प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या, मुघलसरायचे नाव बदलून दीनदयाल उपाध्याय नगर आणि आता आग्र्याच्या मुघल म्युझियमचे नाव छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम केले जाणार आहे. योगी आदित्यनाथ सरकारने आग्र्यात बनत असलेल्या मुघल संग्रहालयाचे नाव बदल्यात येणार असल्याचे सांगून आता हे म्युझियम छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम नावाने ओळखले जाईल. योगी सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी 'जय जिजाऊ, जय शिवराय!' म्हणत योगी सरकारच्या निर्णयाची स्तुती केली आहे.





हे संग्रहालय ताजमहालच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ उभारले जात आहे. हे मुघल म्युझियम आता मुघलांना आव्हान देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. आग्र्यातील विकास कामांचा आढावा घेताना स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली.या निर्णयाची माहिती योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवरुन दिली. त्यांनी लिहिलं आहे की, "आग्रामध्ये सुरु असलेलं म्यूझियम आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखलं जाईल. तुमच्या नव्या उत्तर प्रदेशात गुलामीच्या मानसिकतेच्या प्रतिकांचं कोणतंही स्थाना नाही. आपल्या सगळ्यांचे नाकय शिवाजी महाराज आहेत. जय हिंद, जय भारत." यापूर्वी उत्तर प्रदेश सरकारने, राज्यातील ११ हुतात्म्यांच्या नावाने त्यांच्या जिल्ह्यातील एक-एक रस्त्याचे नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भात अधिसूचनादेखील काढली आहे.
Powered By Sangraha 9.0