मुंबईकरांची चिंता वाढणार : दादर, धारावीत रुग्णवाढ

    दिनांक  14-Sep-2020 21:52:58
|

Dadar_1  H x W:

मुंबई : मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असतानाच दादर, माहीम आणि पुन्हा धारावीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. दादर, माहीम व धारावी या तिन्ही भागात एकूण ११६ नवीन रुग्ण आढळल्याने या भागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८,७३३ वर पोहोचली आहे. माहीम मध्ये आज दिवसभरात ५४ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने येथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २,७६२ वर पोहोचली आहे. ‌
 
तर दादर मध्ये गेल्या ३९ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा ३,०३३ वर पोहोचला आहे. दरम्यान, धारावीत आज दिवसभरात २३ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या २,९३८ वर पोहोचली आहे. यापैकी २,५१२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे धारावीत सध्या १५६ सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.