पश्चिम रेल्वेचे लवकरच ‘डिजिटलायझेशन’!

    दिनांक  14-Sep-2020 16:46:25
|
Western railway_1 &n

रकमेच्या देवघेवीसाठी प्रत्येक स्थानकावर डिजिटल तंत्रज्ञान

मुंबई : डिजिटल इंडियाची पुरस्कर्ते असलेल्या पश्चिम रेल्वेने त्यांच्या प्रत्येक स्थानकात रोकडरहित व्यवहारांना सुरुवात केली आहे. प्रत्यक्ष ग्राहकांशी व्यवहार होणाऱ्या ३५४ स्थानकांसह अनेक ठिकाणी डिजिटल व्यवहारांची सुविधा सक्षम केली आहे.


पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, जास्तीत जास्त डिजिटल व्यवहार करण्याच्या उद्देशाने या स्थानकांना विविध डिजिटल पद्धतीने कॅशलेस व्यवहाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. वेस्टर्न रेल्वेचे दररोज सरासरी ४.५० लाख प्रवसी डिजिटल माध्यमातून तिकिट खरेदी करत आहेत. वरील व्यवहारांव्यतिरिक्त बिले वसूल करने, जमा कामांची देयके, लिलाव विक्री, जमीन भाडे व आतापर्यंत धनादेश / डीडीमार्फत व्यवहार केल्या जाणार्‍या इतर पावती यांसारख्या इतर संकीर्ण व्यवहारांनादेखील डिजिटल व्यवहारांच्या कक्षेत आणले गेले आहे.


ठाकूर यांनी माहिती दिली की, डिजिटल आणि कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन आणि प्रसार करण्यासाठी पश्‍चिम रेल्वेमार्फत विविध अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. आतापर्यंत कॅशलेस व्यवहार सुलभ करण्यासाठी ९२८ पीओएस मशीन्स बसविण्यात आल्या आहेत. सर्व यूपीएस आणि पीआरएस काउंटरवर यूपीआय आणि बीएचआयएमद्वारे देय सुविधा देखील सक्षम केली गेली आहे. पश्चिम रेल्वेवर आरक्षित तिकिटांसाठी मोबाईल अ‍ॅपवरील यूटीएस सर्व पश्चिम रेल्वे स्थानकांसाठी मुंबई उपनगरी विभागातील पथदर्शी प्रकल्प वाढविण्यात आला आहे. क्यूआर कोड आधारित तिकीट मुंबई उपनगरी भागात लागू केले गेले असून लवकरच ते इतर उपनगरीय ठिकाणीही वाढविण्यात येणार आहे.


ग्राहकांकडून डिजिटल व्यवहार सुलभ करण्यासाठी सर्व महत्त्वपूर्ण वस्तूंच्या शेड आणि पार्सल ठिकाणी ९२ पीओएस मशीन्स बसविण्यात आल्या आहेत. चांगल्या प्रतिसादामुळे मोठ्या संख्येने ग्राहकांनी आतापर्यंत ई-पेमेंट सुविधेचा पर्याय निवडला आहे. पार्किंग आणि इन पे अँड यूज कॉन्ट्रॅक्ट यासारख्या इतर क्षेत्रातही डिजिटलायझेशन सुरू केले आहे.


पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक आलोक कंसल यांनी सांगितले की, पंतप्रधानांचे “डिजिटल इंडिया” तसेच “आत्मनिर्भर भारत”चे स्वप्न पूर्ण करण्यात पश्चिम रेल्वे कोणतीही कसर ठेवणार नाही. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, पश्चिम रेल्व सर्व स्थानकांवर १०० टक्के कॅशलेस व्यवहार साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.