सायन रुग्णालयात मृतदेहाची अदलाबदलप्रकरणी दोन कामगार निलंबित!

    दिनांक  14-Sep-2020 13:39:52
|

Sion Hospital_1 &nbsसंतप्त नातेवाईकांचा रुग्णालयासमोर आक्रोश!


मुंबई : कोरोनामुळे रुग्णसंख्येत होणारी वाढ तर दुसरीकडे रुग्णालयात रुग्णांच्या मृतदेहांची अदलाबदली करण्याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. यामुळे मुंबईच्या सायन रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे रुग्णांच्या शवांची अदलाबदल केल्यामुळे एका रुग्णाच्या मृतदेहाचे दुसऱ्याच कुटूंबाकडून अंत्यसंस्कार झाल्याने त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला आहे. हा सर्व प्रकार मुंबई महापालिकेच्या लक्षात येताच त्यांनी रुग्णालयातील २ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे.


सायन रुग्णालयात एक रोड अपघातात जखमी झालेल्या रुग्णावर उपचार सुरु होते. ज्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालयात जेव्हा त्याचे नातेवाईक त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास आले तेव्हा त्यांना त्यांच्या माणसाचा मृतदेह हा दुसऱ्या मृतदेहासोबत बदलण्यात आल्याचे समजले.


घडलेला प्रकार खूपच धक्कादायक असल्याचे कळताच त्या मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. इतकच नव्हे अधिक तपासात अशीही माहिती समोर आली त्या रुग्णाचे कोणत्यातरी अन्य मृताच्या कुटूंबियांनी अंत्यसंस्कार देखील केले. यामुळे झालेल्या घटनेचे दखल घेत महानगरपालिकेने रुग्णालयातील २ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्याचबरोबर या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.