नि. नौदल अधिकारी मारहाण : न बोलणे म्हणजे मुख्यमंत्र्यांचे समर्थन

    दिनांक  14-Sep-2020 11:30:16
|

Navneet Rana_1  
 
नवी दिल्ली : माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर शिवसेनेच्या काही गुंडांनी हल्ला केला. यावर आता खासदार नवनीत राणादेखील आक्रमक झाल्या असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर हल्ला झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी जनतेशी लाईव्ह संवाद साधताना एकही शब्द न बोलणे म्हणजे त्या हल्ल्याचे समर्थन केल्यासारखेच” अशी टीका त्यांनी केली आहे.
 
 
“संवेदनाहीन मुख्यमंत्री याबाबत दिलगिरी सुद्धा व्यक्त करीत नाही. हा संपूर्ण देशातील माजी सैनिकांचा अपमान आहे. याप्रकरणी लोकसभेत आवाज उचलणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना प्रत्यक्ष भेटून माजी सैनिकांची कैफियत मांडणार आहे. याबाबत न्याय मिळवून देऊ. देशातील कुठल्याही माजी सैनिकांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. गुंडप्रवृत्तीच्या हल्लेखोर शिवसैनिकांना कठोर शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही.” असे नवनीत राणा यांनी माहिती दिली.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.