शिवसेनेची 'सोनिया'सेना होताच मुंबईत आतंकी प्रशासन! : कंगना राणावत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2020
Total Views |
kangana_1  H x



शिवसेनेला जोरदार टोला हाणत कंगना पुन्हा मनालीला रवाना!

मुंबई : खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वक्तव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. कंगनाच्या अनधिकृत कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केली होती. त्यानंतर आपल्या कार्यालयात झालेले नुकसान पाहण्यासाठी मुंबईत आलेली कंगना आता चार दिवसानंतर पुन्हा एकदा आपल्या घरी, मनालीला रवाना झाली आहे. मुंबई सोडताना कंगनाने पुन्हा एकदा शिवसेनेला टोला लगावला आहे.






मुंबईत पाच दिवस राहिल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावत सोमवारी सकाळी बहीण रंगोलीसह मनालीला रवाना झाली. मनालीला रवाना होण्यापूर्वी कंगनाने दोन ट्विटमधून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. “मी जड अंतःकरणाने मुंबईतून जात आहे. गेल्या काही दिवसांत मला प्रचंड त्रास दिला गेला. माझ्यावर हल्ला झाला. खोटे आरोप केले गेले. माझे कार्यालय तोडले. माझे घर तोडण्याची धमकी दिली गेली. सुरक्षारक्षक हत्यारे घेऊन माझे संरक्षण करत आहेत. मला वाटते पाकिस्तानशी तुलना करणे योग्यच होते”, मुंबई सोडताना कंगनाने अशा आशयाचे ट्विट केले आहे.



जेव्हा रक्षकच हे भक्षक झाल्याचे दाखवत आहे, त्यामुळे तेच लोकशाहीचे चीरहरण करत आहे. मला कमजोर समजून त्यांनी मोठी चूक केली आहे, असा पलटवार कंगनाने सेनेवर केला आहे. तसेच, त्यांना वाटले मी एक महिला आहे. घाबरून जाईन. पण मला भीती घालवून त्यांनीच आपली प्रतिमा धुळीस मिळवली आहे, अशी टीकाही कंगनाने शिवसेनेवर केली. दरम्यान, रविवारी मुंबई महानगरपालिकेने कंगनाला तिच्या राहत्या घरासंदर्भात नवीन नोटीस पाठवली आहे. ही नोटीस कंगनातील खार येथील घरी करण्यात आलेल्या बेकायदा बांधकामांसंदर्भातील आहे.







@@AUTHORINFO_V1@@