निवृत्त सेनाधिकारी मारहाण प्रकरण : शिवसेनेविरोधात कांदिवली येथे जोरदार निदर्शने!

14 Sep 2020 18:42:26

Madan sharma_1  


मदन शर्मांसह निवृत्त सैनिकांचा सहभाग 


मुंबई : शिवसेना कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मदन शर्मांच्या निवासस्थानी सोमवारी जोरदार निषेध प्रदर्शन करण्यात आले. कंदिवलीतील नागरिक, निवृत्त लष्कर अधिकारी या निदर्शनात सहभागी झाले होते. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करून उद्धव ठाकरेंनी या प्रकरणी सरकारची भूमिका जाहीर करावी अशी मागणी उपस्थितांच्या वतीने करण्यात आली.


उद्धव ठाकरेंच्या विरोधात व्यंगचित्र शेअर केले म्हणून मदन शर्मा या निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर भ्याड हल्ला शिवसैनिकांनी केला होता. त्यानंतर महाविकास आघाडीविरोधातील असंतोष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सोमवारी कांदिवली येथे मदन शर्मांच्या राहत्या घराबाहेर शेकडो नागरिकांनी निषेध प्रदर्शन केले. उद्धव ठाकरे, महाविकास आघाडी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी निदर्शनस्थळी मोठ्या प्रमाणावर फौजफाटा मागविला होता. मदन शर्मा स्वतः या निदर्शनात सहभागी झाले होते.


कर्नल रमेश चंद्रा (सेवानिवृत्त), कमांडर विजय सिंह (सेवानिवृत्त) निदर्शनस्थळी उपस्थित होते. कांदिवली पूर्वेचे आमदार अतुल भातखळकर, उत्तर मुंबई भाजपचे मा. जिल्हाध्यक्ष विनोद शेलार तसेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या निषेध प्रदर्शनात सहभाग घेतला होता.



माझ्यासोबत दगाफटका झाला
'माझ्याशी बोलायचं आहे', अस सांगून मला घराबाहेर बोलवण्यात आले. मी बातचीत करण्याच्या हिशोबाने बाहेर आलो आणि अचानक दहा-पंधरा लोकांनी माझ्यावर हल्ला चढविला. माझ्यासोबत दगाफटका झाला. जर हल्ला करण्यासाठी येत आहोत, हे आधी कळवले असते तर गोष्ट वेगळी होती. माझे अपहरण करून नेण्याचा प्रयत्न झाला. परंतु मी प्रतिकार केल्यामुळे हल्लेखोर मला सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत.
- मदन शर्मा




Powered By Sangraha 9.0