कोरोना चीनी प्रयोगशाळेतच तयार झाला! : शास्त्रज्ञ देणार पुरावे

14 Sep 2020 16:11:56
Dr. Li.-Meng_1  
 
 
 
वॉशिंग्टन : कोरोना विषाणू हा वुहानच्या प्रयोगशाळेतच तयार करण्यात आला. वुहान मार्केटमधून याचा प्रसार झाल्याचे चीनचे दावे खोटे असून हा विषाणू चीन पुरस्कृतच आहे, असा गंभीर आरोप चीनी विषाणू शास्त्रज्ञ डॉ. ली-मेंग यान यांनी केला आहे. चीनी विषाणूमुळे अवघे जग संकटात ओढावले आहे, लवकरच याबद्दलचे सर्व पुरावे मी सादर करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. चीनच्या शासकीय प्रयोगशाळेत या विषाणूची निर्मिती झाली, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.
 
 
 
विषाणूशास्त्रज्ञ यांनी केलेला दावा खरा ठरल्यास चीनतर्फे जगाविरोधात पुकारण्यात आलेल्या या जैविक युद्धाचे पुढे गंभीर परिणाम जाणवू शकतात. डिसेंबरमध्ये जेव्हा कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाला त्यावेळेस चीनची यंत्रणा आपल्या देशातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील होती. मात्र, चीनमधून बाहेरील देशांत जाणाऱ्यांद्वारे या रोगाचा प्रसार होत असल्याची बाब लक्षात असूनही जाणून बुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आले. ही गोष्ट चीनने त्यावेळी सार्वजनिकरित्या मान्य केली आहे.
 
 
 
 
हॉंगकॉंग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये व्हायरलॉजी आणि इम्यूनोलॉजीमध्ये तज्ज्ञ असलेल्या डॉ. ली-मेंग यांनी हे खुलासे अमेरिकेत सुरक्षितरित्या पलायन केल्यानंतर त्यांना करता आले आहेत. चीनमध्ये राहून अशाप्रकारे सरकारविरोधात आरोप करणे त्यांना शक्य झाले नसते. त्यामुळे आता लवकरच याबद्दल पोलखोल करणार आहोत, असा दावा त्यांनी केला आहे. ११ सप्टेंबर रोजी एका अज्ञात ठिकाणाहून ब्रिटीश टॉक शो 'लूज वुमन' या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यात कोरोना विषाणूचा आजार, त्याबद्दलच्या समस्या आणि आव्हाने यातील संशोधनाविषयी त्यांनी माहिती दिली होती.
 
 
 
डॉ. ली. मेंग यांनी न्युमोनिया (new pneumonia) या आजारावर दोन संशोधने केली. डिसेंबर आणि जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात ते पूर्ण केले. त्यातून मिळालेली माहिती तिच्या संशोधनाचे मार्गदर्शकांना सोपवली. ते जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार आहेत. जागतिक आरोग्य संघटना आणि चीनी सरकारविरोधात ते त्या पुराव्यानिशी आवाज उठवतील, अशी डॉ. मेंग यांची अपेक्षा होती. मात्र, त्यांनीच तिला गप्प राहण्याचा सल्ला दिला, अन्यथा तु गायब होशील, असे म्हणत धमकीवजा इशाराच दिला. ही बाब माझ्यासारखीला देश सोडण्यासाठी पुरेशी होती, असेही त्या म्हणाल्या.



 
Powered By Sangraha 9.0