आहे ते 'बेस्ट' आहे!, जादा प्रवासी नकोच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2020
Total Views |
BEST_1  H x W:



वडाळा आगारात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

मुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना बेस्ट बसमध्ये जादा प्रवासी वाहतूक करण्याचा आदेश देण्यात आल्याच्या विरोधात बेस्ट कामगारांनी सोमवारी वडाळा आगारासमोर निदर्शने केली. जादा प्रवासी वाहतुकीच्या आदेशाबाबत बेस्ट कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे कामगारांसह प्रवाशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कामगार नेते नितीन पाटील, विठ्ठल गवस आदी उपस्थित होते.


लॉकडाऊन काळात लोकल बंद असताना बेस्ट मुंबईकरांच्या सेवेत आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सध्या लोकल सुरु असली तरी सामान्य प्रवाशांसाठी बेस्टचाच आधार आहे. सेवा बजावताना अनेक बेस्ट कामगारांना कोरोनाची लागण झाली आहे. काहींना यात जीवही गमवावा लागला आहे. कामगारांना वैद्यकीय व आवश्यक सुविधाही देण्यात आलेल्या नाहीत. कोरोनाचा कहर सुरू असताना बेस्ट प्रशासनाने जादा प्रवासी वाहतूक करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता ही बाब घातक असल्याचे कामगार नेते शशांक राव यांनी म्हणाले. प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून निदर्शने केल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@