संसदेचं ऐतिहासिक पावसाळी अधिवेशन उद्यापासून

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2020
Total Views |

parliement_1  H



नवी दिल्ली :
संसदेच्या अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. कोरोना काळात होणाऱ्या या संसदेच्या अधिवेशनात अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडणार आहेत. त्यासाठी सुरक्षिततेसाठी व्यवस्थाही करण्यात येत आहे. कोरोना काळात संसदेचे ऐतिहासिक अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. राज्यसभा सकाळी ९ ते १ आणि लोकसभा दुपारी ३ ते ७ अशा दोन सत्रांमध्ये हे कामकाज होणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर लोकसभेचे कामकाज सुरु असताना लोकसभेचे खासदार राज्यसभेतही बसलेले आढळलेले आढळतील. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला १४ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. १ ऑक्टोबरपर्यंत अधिवेशन सुरू राहील. कोरोनाचं संकट असल्याने संसदेत विशेष तयारी सुरू आहे. खासदारांच्या कोरोना चाचण्यांसोबतच दोन्ही सदनांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग लक्षात घेऊन आसन व्यवस्था तयार करण्यात येत आहे. यासाठी दोन चेंबर आणि गॅलरीचा उपयोग करण्यात येईल.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी एक पत्रकार परिषद घेतली. 'या संकट काळात आपण सगळे एक आहोत. आता वेळ घटनात्मक जबाबदारी पूर्ण करण्याची आहे. अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी सर्व सदस्यांना त्यांची कोरोना चाचणी करायची आहे. खासदार डिजिटल पद्धतीनं त्यांची उपस्थिती नोंदवू शकतात. यंदा संसदेत डिजिटल कामकाज होईल. याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत सॅनिटायझेशनदेखील करण्यात येईल,' अशी माहिती बिर्ला यांनी दिली होती.
@@AUTHORINFO_V1@@