राज्यपालांनी माझे म्हणणे स्वत:च्या मुलीसारखे ऐकून घेतले : कंगना राणावत

    दिनांक  13-Sep-2020 17:57:21
|
Koshyari_1  H x

अभिनेत्री कंगना राणावत राज्यपालांच्या भेटीला!


मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वक्तव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज कंगनाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान साधारण ४० मिनिटे दोघांची चर्चा झाली. यावेळी तिची बहीण रंगोलीही तिच्यासोबत होती.कंगना आणि शिवसेना असा वाद पेटला असतानाच बृह्नमुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली होती. उद्धव ठाकरे यांनी कंगना राणावत प्रकरणाची अयोग्य पद्धतीने हाताळणी केली, असे म्हणत राज्यपालांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कंगना व राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीवरून राजकीय चर्चा रंगल्या आहेत.


“मी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. मला मिळालेल्या अन्यायकारक वागणुकीबद्दल सांगितले. मला आशा आहे की मला न्याय मिळेल, जेणेकरुन तरुण मुलींसह सर्व नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास पुन्हा संपादन होईल. माझे भाग्य आहे की राज्यपालांनी माझे म्हणणे स्वत:च्या मुलीसारखे ऐकून घेतले”, अशी प्रतिक्रिया कंगनाने भेटीनंतर दिली.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.