माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचे निधन

13 Sep 2020 14:19:50

Raghuvansh _1  



श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात सुरु होते उपचार

दिल्ली : राजद नेता आणि लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय रघुवंश प्रसाद सिंह यांचे वयाच्या ७४व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी दिल्लीच्या एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या चार दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


या आधी रघुवंश पटना एम्समध्ये दाखल होते. तेव्हा त्यांनी २३ जूनला पार्टीच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. ते रामा सिंहच्या राजदमध्ये गेल्याच्या वृत्तामुळे नाराज होते. रघुवंश यांना १८ जूनला कोरोनाची लागण झाली होती. तर एक जुलैला त्यांना पटना एम्समधून सुट्टी मिळाली होती.


१० सप्टेंबरला त्यांनी रुग्णालयाच्या बेडवरुनच राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांना राजीनामा पाठवला होता. आपल्या राजीनाम्यात त्यांनी लिहिले होते की, 'जन नायक कर्पूरी ठाकूरच्या निधानंतर ३२ वर्षे तुमच्या पाठीमागे उभा राहिलो, पण आता नाही. पार्टी, नेता, कार्यकर्ता आणि आम जनतेचे खूप प्रेम मिळाले, मला माफ करा.'


यावर रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात असलेल्या लालू प्रसाद यादव यांनी आपल्या निकटवर्तीयाच्या नाराजीनंतर स्वतः मोर्चा सांभाळला. रघुवंश यांना पत्र पाठवले, 'राजद कुटुंब तुम्हाला लवकर बरे होऊन सर्वांमध्ये पाहू इच्छिते. चार दशकांमध्ये आपण प्रत्येक राजकीय, सामाजिक आणि कौटुंबीक प्रकणांमध्ये बसून विचार केला आहे. तुम्ही अवश्य बरे व्हा यानंतर बसून बोलूया. तुम्ही कुठेही जाणार नाही हे समजून घ्या.' रघुवंश यांच्या निधनाच्या वृत्तानंतर आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी 'प्रिय रघुवंश बाबू! तु काय केलस मी तुला आदल्या दिवशी बोललो होतो, तू कुठेही जात नाहीस. पण तू आतापर्यंत गेलास. मी दुःखी आहे, तुझी खूप आठवण येईल', असे ट्विट करत आपला शोक व्यक्त केला.





Powered By Sangraha 9.0