माजी सैनिकांवरील हल्ले खपवून घेणार नाही : केंद्रीय संरक्षण मंत्री

12 Sep 2020 20:29:47

rajnathsing_1  


नवी दिल्ली :
माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या घटनेची दखल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली आहे. राजनाथ सिंह यांनी मदन शर्मा यांना फोन केला आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राजनाथसिंह यांनी ट्विट करून ही माहिती दिली.


ट्विटमध्ये त्यांनी मारहाण झालेल्या माजी नौदल अधिकाऱ्याला राजनाथ सिंह त्यांच्याशी संपर्क केल्याची माहितीही दिली. 'काही गुंडांनी माजी अधिकाऱ्याला मारहाण केली. यासंदर्भात अधिकाऱ्याला फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसंच सैन्यातील माजी अधिकाऱ्यावर झालेला हा हल्ला खेदजनक आहे. आणि असे हल्ले अजिबात खपवून घेतले जाणार नाही', असेही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्टून व्हॉट्सअॅप ग्रुपवर फॉरवर्ड केल्याच्या रागातून शिवसेना कार्यकार्त्यांनी ही मारहाण केली. या प्रकरणी शिवसेना कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र काही वेळातच आरोपींना जामिनावर सोडून देण्यात आले. याचा भारतीय जनता पक्ष आणि शर्मा यांच्या कुटुंबीयांनी निषेध करत पोलीस आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. पोलीस अधिकाऱ्यांनी केलेली विनंती आणि गृहमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर भाजपने आंदोलन मागे घेतले. पण शिवसैनिकांना संबंधित कलमं लावली नाही तर पुन्हा एकदा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.
Powered By Sangraha 9.0