अभिनेता सोनू सूद आता गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीला!

    दिनांक  12-Sep-2020 18:31:02
|

Sonu sood_1  Hगरजू विद्यार्थ्यांसाठी सोनू सूदने आईच्या नावाने सुरू केली स्कॉलरशिप


मुंबई : लॉकडाऊनमध्ये पायी पायी निघालेल्या कामगारांसाठी बस, रेल्वेची सोय करून त्यांना त्यांच्या घरी पोहचवणे, परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणणे, कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे, पुण्याच्या लाठीकाठी चालवणाऱ्या आजीला लाठी काठीचे प्रसिक्षण वर्ग सुरू करून देऊन त्यांची आयुष्याची सोय करून देणे अशा या ना त्या अनेक चांगल्या कार्यामुळे सोनू सूद सध्या विशेष चर्चेत आहे.

आता त्याने गरजू विद्यार्थ्यांसाठी मोठे पाऊल उचलले आहे. पैशाअभावी अनेक हुशार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. अशा गरजू विद्यार्थ्यांना सोनू सूद मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देत आहे. गरजू विद्यार्थ्यांसाठी त्याने स्कॉलरशिप सुरू केली आहे.


या स्कॉलरशिपला सोनू सूदने आपल्या दिवंगत आईचे नाव दिले आहे. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप लाँच करत असल्याचे त्याने ट्विट करत सांगितले आहे. ‘आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचण्यासाठी आर्थिक आव्हाने अडचणी ठरू नये, असा माझा विश्वास आहे. स्कॉलरशिपसाठी पुढील १० दिवसांत scholarships@sonusood.me मेलवर अर्ज करा’, असे सोनू सूदने ट्विट केले आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.