निवृत्त नौदल अधिकारी मारहाण प्रकरण : ‘त्या’ शिवसैनिकांची २४ तासात सुटका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Sep-2020
Total Views |

Ex navy officer_1 &n
 
मुंबई : शुक्रवारी काही शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्टून सोशल मिडीयावर शेअर केले म्हणून एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली होती. देशाच्या सेवेत आयुष्य घालवलेले मदन शर्मा हे निवृत्त नौदल अधिकारी आहेत. त्यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर शाखाप्रमुख कमलेश कदम यांच्यासह ५ जणांना अटक करण्यात आली. मात्र, त्यानंतर २४ तासांच्या आत शनिवारी त्यांची जामिनावर सुताकादेखील झाली. त्यामुळे अनके प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत.
 
 
कंगना रानौतच्या प्रकरणानंतर मदन शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगात्मक कार्टून सोशल मिडीयावर शेअर केले होते. त्यानंतर शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम यांच्यासह १०- १२ जणांनी त्यांच्या सोसायटीमध्ये जाऊन शर्मा यांना मारहाण केली. यासंबधी त्यांच्या परिवाराने गुन्हादेखील नोंदवला. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर कदम यांच्यासमवेत ५ शिवसेना कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी भाजपकडून होत असतानाच शनिवारी त्या शिवसैनिकांची सुटकादेखील करण्यात आली आहे. याप्रकरणी ट्विटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांचे ‘गुंडाराज’ चालू आहे का असा प्रश्न विचारला जात आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@