ठाकरे सरकारने ‘गुंडाराज’ थांबवावा! : देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Sep-2020
Total Views |
Devendra_1  H x



व्हाट्सऍप मेसेज फॉरवर्ड वादातून माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण!

मुंबई : कांदिवली इथे राहणारे माजी नौदल अधिकारी मनोज शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर असलेले व्यंगात्मक कार्टून फॉरवर्ड केले म्हणून त्यांच्या घरात घुसून शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आली. राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली. कंगना आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आला असतानाच शिवसैनिकांनी एका निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.



naval offiver_1 &nbs






व्हाट्सऍप मेसेज फॉरवर्ड केल्यावरून उत्पन्न झालेल्या वादातून माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. ही घटना निंदनीय असून राज्यासह देशात अनेक वेळा अशा घटना घडलेल्या दिसून येतात. देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय धक्कदायक आणि दुःखद घटना. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला व्हाट्सऍप मेसेज फॉरवर्डच्या वादातून शारीरिक इजा करण्यात आली. माननीय उद्धव ठाकरे कृपया हा गुंडाराज थांबवावा. या गुंडांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो. अस फडणवीस म्हणाले आहेत.










@@AUTHORINFO_V1@@