'रिपब्लिक वाहिनीचे प्रसारण तातडीने बंद करा ; अन्यथा...'

    दिनांक  11-Sep-2020 16:27:35
|


letter_1  H x W
मुंबई :
पत्रकारांना आणि मीडिया नेटवर्कला धमकविण्याचे शिवसेनेचे काम सुरूच आहे. शिवसेनेने गुरुवारी (१० सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील स्थानिक केबल ऑपरेटरना 'रिपब्लिक भारत'च्या प्रसारणावर बंदी घालण्यास सांगितले. शिवसेना खासदार संजय राऊत यांना आपले मार्गदर्शक म्हणून संबोधित करताना शिव केबल नेटवर्क या संघटनेने एक पत्रक जारी केले. तसेच असे न झाल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असेही म्हंटले.रिपब्लिक टीव्हीविरोधात शिवसेनेने उचललेले हे पाऊल बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूविषयी 'रिपब्लिक टीव्ही'च्या वार्तांकनाच्या दरम्यान समोर आले आहे. याशिवाय महाराष्ट्रात नुकत्याच अभिनेत्री कंगना रनौत यांच्या कार्यालयात मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कारवाईमुळे शिवसेनेला चहुबाजूनी घेरले जात आहे आणि रिपब्लिक टीव्हीनेही आपल्या वृत्तवाहिनीवर ठळकपणे हे जाहीर केले आहे. शिवसेनेने नामांकित टीव्ही केबल ऑपरेटर हॅथवे, डीईएन, इन केबल, जीटीपीएल, सेव्हन स्टार, सिटी केबल्स यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'रिपब्लिक टीव्ही'ने मुख्यमंत्री सीएम उद्धव ठाकरे यांच्यासाठी वारंवार अपमानास्पद भाषा वापरुन पत्रकारिता केली आहे. नीतिशास्त्र आणि मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे. त्यात नमूद केले आहे की, अर्णब गोस्वामी यांनी न्यूजरूममध्ये 'समांतर न्यायालय' तयार केले आहे. या पत्रात कंगना राऊत यांना 'हरमखोर' म्हणविणारे शिवसेना प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांचे 'मुख्य मार्गदर्शक' असल्याचे दिसून येते.letter_1  H x W


रिपब्लिक टीव्हीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आळा घालण्यासाठी शिवसेनेने केलेल्या प्रयत्नांनंतर रिपब्लिक मीडिया नेटवर्कने एक निवेदन जारी केले असून त्यात म्हंटले आहे की, शिवसेना शाखेचा भाग असलेल्या शिवसेनेची केबल संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आहे. त्यांनीच आदेश जारी केला. रिपब्लिक टीव्हीने म्हटले आहे की या आदेशामुळे महाराष्ट्रातील केबल ऑपरेटर्सना खुली धमकीच देण्यात आलीआहे. एखाद्या वृत्तवाहिनीला आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी सत्ताधारी पक्षाची यंत्रणा धमकी देण्याच्या पद्धतींचा वापर करणे हे भारतीय घटनेच्या कलम १९(अ) अंतर्गत उल्लंघन आहे. रिपब्लिक इंडिया थांबवण्याचा हा प्रयत्न हा पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावरील हल्ला आहे आणि ही आपत्कालीन मानसिकता प्रतिबिंबित करते की आजच्या काळातील अराजकता आणि या महान लोकशाहीची विडंबना आहे. " पुढे ते म्हणतात की, "महाराष्ट्रातील पालघरमध्ये साधूंच्या मॉब लिंचिंगच्या घटनेचे प्रक्षेपण झाल्यापासून रिपब्लिक टीव्ही चॅनेल महाराष्ट्र सरकारच्या निशाण्यावर आहे. यानंतर, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या घरी बीएमसीने केलेल्या तोडफोडीच्या कव्हरेज दरम्यान मुंबई पोलिसांनी धक्का बुक्की करून रिपब्लिक चॅनलच्या पत्रकारांना अटक केली."
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.