देशाचे संरक्षण करणाऱ्या निवृत्त अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण

11 Sep 2020 20:16:38

Kandivli Case_1 &nbs
 
मुंबई : कंगना रानौतच्या पाली हिल येथील कार्यालयावर कारवाई केल्यानंतर आता शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठकरे हे पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. याचे कारण मुख्यमंत्र्यांचा एक व्यंगात्मक फोटो व्हाट्सएप वर फॉरवर्ड केला म्हणून काही शिवसैनिकांनी एका सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना कांदिवली परिसरामध्ये घडली आहे. यावरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता घरात बसून तानाशाही करत आहेत.” असा आरोप केला आहे.
 
 
“एका महिलेवर ताकद आजमावल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्टून व्हाट्सएपवर फॉरवर्ड केले म्हणून शिवसैनिकांनी घरात घुसून मदन शर्मा या माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली. या हाणामारीमध्ये त्यांच्या डोळ्याला जबर दुखापत झाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी सत्तापिसाटांचा हा माज उतरवण्याची वेळ आली आहे, असेच म्हणावे लागेल. देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी आयुष्यातील बरीच वर्षे खर्ची घातली, असे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना भुरट्या शिवसैनिकांनी केलेली मारहाण पक्षाची मानसिकता दाखवणारी आहे. जे घराबाहेर पडण्याची हिंमत दाखवून शकले नाहीत, त्यांचे चेले वृद्धाना ताकद दाखवत आहेत. मुख्यमंत्र्यांची घरी बसून तानाशाही चालली आहे.” अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. फिर्यादी मदन शर्मा यांच्या तक्रारीवरुन आरोपी कमलेश कदम व त्याच्या ८ ते १० साथीदारांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
Powered By Sangraha 9.0