कोरोनाशी लढाई संपली, कंगनाशी सुरू आहे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2020
Total Views |

devendra fadnavis_1 



नवी दिल्ली :
कंगना रानौत आणि शिवसेना हा वाद देशभरात चर्चेचा विषय ठरला. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात सरकारला आलेले अपयश झाकण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून हे प्रकरण अधिक वाढविले जात असल्याची टीका विरोधीपक्ष भाजपने केली. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरून पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले.



देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत आहेत. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना 'राज्य सरकारची कोरोनाशी लढाई संपली आता कंगनाशी सुरुये' असे म्हणत टीका केली. तसेच कंगना प्रकरण कोणी सुरु केले? असा सवालही त्यांनी यावेळी केला. यावेळी देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षण, राज्यातील कोरोना परिस्थिती, एकनाथ खडसे यांसारख्या विषयावर संवाद साधला.जगात सर्वाधिक वेगानं कोरोनाचं संक्रमण भारतात वाढत आहे. राजेश टोपेंनी दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा ९ ,८९ ,९३४वर गेला आहे. यातले ७ लाख ७१५ बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या २६१४३२ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर राज्यात २७ ,७८७ लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. हा एकूण आकडा लक्षात घेतला तर महाराष्ट्र राज्य कोरोनाबाधितांच्या संख्येत पाचव्या स्थानी आलं आहे.



वर्ल्डमीटरच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत आजच्या सकाळपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ६,५८८,१६३ इतकी होती तर मृतांची संख्या १९६३२८ हजार इतकी वाढली. भारतात आतापर्यंत ४५६२४१४ लोक कोरोना बाधित झाले असून ७६,३०४ लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये बाधितांची संख्या ही ४,२३९,७६३गेली असून १२९,५७५ लोकांचा मृत्यू झाला आहे. चौथ्या स्थानी १,०४६ ,३७० रुग्णसंख्येसह रशियाचे नाव आहे. मात्र या आकडेवारीत एकट्या महाराष्ट्राची आकडेवारी जगात पाचव्या स्थानावर आहे. अशातच राज्यातील आरोग्य सुविधांबाबत येणाऱ्या तक्रारींमध्येही वाढ होते आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणांचे तीन तेरा वाजले आहेत. यावरूनच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.


@@AUTHORINFO_V1@@