तुमचं सरकार एका महिलेचा छळ करतंय सोनिया गांधी तुम्ही गप्प का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2020
Total Views |

congress_1  H x


मुंबई :
गेल्या दोन दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात सुरू झालेला वाद कमालीचा विकोपाला गेला आहे. मुंबईची पीओकेशी तुलना करणाऱ्या कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई केल्यानंतर कंगना राणौत अधिकच संतप्त झाली आहे. अशातच तिने ट्विट करत आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना काही सवाल केले आहे.


'आदरणीय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीजी एक महिला असूनही महाराष्ट्रात तुमच्या सरकारने माझ्यावर केलेल्या वागणुकीमुळे आपण दु: खी होत नाही? डॉ. आंबेडकर यांनी आम्हाला दिलेल्या राज्यघटनेची तत्त्वे पाळण्याची विनंती तुम्ही तुमच्या सरकारला करू शकत नाही का ' असा सवाल कंगनाने सोनिया गांधींना केला आहे. पुढे ती म्हणते, आपण पश्चिमेस वाढलात आणि भारतात वास्तव्य केले आहे. महिलांना कराव्या लागणाऱ्या संघर्षाची तुम्हाला माहिती असेल. जेव्हा आपले स्वत: चे सरकार महिलांना त्रास देत असेल आणि कायदा व सुव्यवस्थेची एकूणच चेष्टा करत असेल तेव्हा आपली शांतात आणि उदासिनता इतिहासात लिहिली जाईल. मला आशा आहे की आपण यात हस्तक्षेप कराल" असे म्हणत कंगनाने आता या वादात काँग्रेसला देखील सवाल केले आहे. आता तिच्या या प्रश्नांवर सोनिया गांधी व काँग्रेस पक्ष काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

@@AUTHORINFO_V1@@