मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढा, नाहीतर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2020
Total Views |

Udayanraje Bhosle_1 
 
सातारा : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीचा निर्णय घेतला. यानंतर विरोधकांनी ‘राज्य सरकारला याबाबत बाजू मांडता आली नाही’ अशी टीका करण्यास सुरुवात केली. आता यावर साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनीदेखील आपले मत व्यक्त करताना “मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढा नाहीतर परिणामांना सामोरे जा.” अशी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
 
 
खासदार उदयनराजे भोसले यांनी ट्विट केले आहे की, “सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला मोठी खिळ बसली आहे. सरकारने समाजाला विश्वासात घेवून योग्य ती कार्यवाही केली असती, तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते.” असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.
 
 
“माझे सरकारला एवढेच सांगणे आहे की, जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या सवलती तसेच नोकरभरतीतले आरक्षण कायम ठेवावे यासाठी सरकारने तातडीने अध्यादेश काढावा. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे.” असा आक्रमक पवित्रा घेत त्यांनी सांगितले आहे. पुढे ते म्हणाले की, “मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात मी त्यांच्यासोबत आहे. समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करू. या लढ्यात मराठा समाजासोबत मी आहे हे सरकारने लक्षात ठेवावे.” असा समाजदेखील त्यांनी दिला आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@