हायकमांडचा आदेश! कंगनाला प्रत्युत्तर द्यायचे नाही

11 Sep 2020 15:02:16

Kangna Ranaut_1 &nbs



नवी दिल्ली :
अभिनेत्री कंगना रणौत हिने काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेत शिवसेनेचा उल्लेख सोनिया सेना, असा केल्यानंतर झालेल्या वादावर कुठलीही प्रतिक्रीया देऊ नका, असे आदेश हायकमांकडून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना देण्यात आले आहेत. शिवसेना, राज्य सरकार विरूद्ध कंगना रणौत यांच्यातील वादात न पडण्याचे आवाहन नेत्यांना करण्यात आले आहे. कंगनाने सोनिया गांधींचे नाव घेत शिवसेनेचा उल्लेख सोनिया सेना असा केला होता. दरम्यान, मातोश्रीहूनही यावर कंगनाला कोणी उत्तर देऊ नये, असे आदेश शिवसेना प्रवक्त्यांकडून देण्यात आले आहेत. कंगनाच्या कार्यालयावर कारवाई झाल्यानंतर हे आदेश देण्यात आले होते.
 
 
दरम्यान, कंगनाने आज पुन्हा एकदा शिवसेना आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. थोर नेते बाळासाहेब ठाकरे हे माझे सर्वात आवडत्या नेत्यांपैकी एक आहेत. शिवसेना काँग्रेसह युती करेल, अशी त्याची भीती होती. आज त्यांच्या पक्षाने काय केले आहे. त्यांच्या पक्षाची आजची स्थिती पाहून त्यांना काय वाटत असेल?, असा प्रश्न तिने विचारला आहे. यासोबतच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे.
 
 
आदरणीय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, एका महिलेला तुमच्या सरकारने दिलेली वागणूक पाहून तुम्हाला वेदना झाल्या नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला दिलेल्या राज्यघटनेची तत्त्वे पाळण्याची विनंती तुम्ही तुमच्या सरकारला करू शकत नाही?, महिलांच्या कष्टाची तुम्हाला जाण असेल, तुमचे स्वतःचे सरकार जेव्हा महिलांना त्रास देत होते. कायदा आणि सुव्यवस्थेची चेष्टा करत तुमच्या सरकारमध्ये झाली. एका महिलेला सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न तुमच्या सरकारतर्फे झाला, त्यामुळे तुम्ही वेळीच हस्तक्षेप कराल, अशी अपेक्षा आहे, असेही ती म्हणाली.



 
 
Powered By Sangraha 9.0