ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे !

    दिनांक  10-Sep-2020 12:52:14
|

shivsena_1  H xमुंबई :
गेले काही दिवस कंगना आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढला आहे.खरंतर या वादाला इतकं महत्त्व देण्यासारखं काहीच नव्हतं परंतु महाराष्ट्रातल्या कोरोनाच्या परिस्थितीवर जनतेने दुर्लक्ष करावे यासाठी शिवसेनेने ही गोष्ट लावून धरली आणि तिच्या मागे लांडग्यासारखे लागले. कंगनाच्या कोणत्याही व्यक्तिगत भूमिका व वक्तव्यांशी आम्ही सहमत नाही परंतु तिला गुंड प्रवृत्तीने धमक्या देणे हे कितपत योग्य आहे? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवसेनेला केला. याबाबत पत्रक ट्विट करत चंद्रकांतदादा पाटील यांनी हा सवाल केला.ते म्हणतात, "हे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणवतात परंतु महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराची सून मानाने साडीचोळी देऊन घरी पाठवली होती. परस्त्री विषयी असलेल्या आदरयुक्त धोरणाचा महाराजांनी नेहमीच अवलंब केला आणि हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. सत्ताधारी पक्षाने एका स्त्रीला अशी धमकी देणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. महाराष्ट्र आणि मुंबईची काळजी खरंच सत्ताधारी पक्षाला असेल तर ती त्यांनी आपल्या प्रशासकीय कामात दाखवावी. महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांमुळे जनता त्रस्त आहे, मुंबई त्रस्त आहे त्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित. कोणत्याही स्त्रीला धमकी देऊन काळजीचा खोटा आव आणू नये , असे म्हणत शिवसेनेची कानउघडणी केली.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.