आत्महत्या प्रतिबंध दिनालाच 'मराठा' तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

    दिनांक  10-Sep-2020 14:52:30
|

Maharashtra _1  
 

 
लातूर : लातूर जिल्ह्यात बोरगावात लातूर वैद्यकीय महाविद्यालाच्या आवारात किशोर कदम या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षण न्यायालयात न टिकल्याने त्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नजीक उपस्थित व्यक्तींनी त्याला तातडीने रुग्णालयात हलवले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायलयात स्थगिती आणण्यात आली आहे. यामुळे नैराश्येत जाऊन त्याने हे पाऊल उचलले आहे. आज जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन आहे, अशावेळी तरुणाने आत्महत्या करणे हे दुर्देवी असल्याच्या प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. 
 
 
 
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी मराठा आरक्षणासंदर्भात बैठक घेतली जाणार आहे. मराठा आरक्षण न्यायालयात टीकवू न शकल्याने तरुणांवर ही वेळ आली असल्याची टीका भाजपतर्फे करण्यात येत आहे. मराठा आरक्षणावर स्थगिती आली नाही, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला आहे. मराठा आरक्षण संघटनांनी राज्य सरकार आणि चव्हाण यांच्याविरोधात गनिमीकावा वापरून आंदोलन करणार असल्याचे मत व्यक्त केली आहे.
 
 
 
कदम यांनी आत्महत्या करणे हे दुर्दैवी आहे, महाराष्ट्रातील तरुणांनी आत्महत्येचे पाऊल उचलू नये, असे आवाहन मराठा संघटनेतर्फे करण्यात आले आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात त्वरीत निर्णय घेऊन समाजाला आश्वस्त करावे, असे त्यांनी सांगितले आहे. हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करतानाच आरक्षण प्रक्रियेलाही स्थगिती देण्यात आली. अॅडमिशन प्रोसेस आणि नोकऱ्यांबाबत या आरक्षणाचा उपयोग देण्यात येऊ नये असे न्यायालयाने म्हटले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.