सेना नेत्यांच्या बेकायदा बांधकामांविरोधात किरीट सोमय्या यांची तक्रार

    दिनांक  10-Sep-2020 16:45:42
|
Kiritji Sommaiya _1 
 
 


महापौर कुटूंबिय व मंत्री अनिल परब यांच्याकडून मागविले स्पष्टीकरण
मुंबई :
भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिका महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्याचे परिवाहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात एसआरए आणि म्हाडा प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी संबंधित नेत्यांनी उत्तरे द्यावी तसेच बेकायदेशीर प्रकार आढळल्यास कारवाई करवी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
 
 
 
किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटले की, "मी झोपडपट्टी पूर्नविकास प्राधिकरणाकडे महापौर व त्यांचे कुटूंबिय यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. एसआरए प्रकल्पातून उभ्या असलेल्या वरळीतील इमारतीतील बोगस कंपन्या आणि त्यांची अपारदर्शकता या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तसेच शिवसेना नेते व मंत्री अनिल परब यांच्या नावे म्हाडा प्राधिकरण अधिकाऱ्यांनी लिहीलेल्या एकाचा उल्लेख करत स्पष्टीकरण द्यावे ", अशी मागणीही त्यांनी केली आहे.
 
 
 
 
 
मंत्री अनिल परब उत्तर द्या!
 
एका रहिवाशाने २७ जून २०१९ रोजीचे पत्र ट्विट करत सोमय्या यांनी मंत्री अनिल परब यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. खार रोड येथील रहिवासी विकास गंगाराम शेगले यांनी अनिल परब यांच्या कार्यालयाच्या नावे उभारण्यात आलेल्या बांधकाम प्रकरणी म्हाडा प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली होती. गांधीनगर, वांद्रे पूर्व विभागातील इमारत क्रमांक ५७ व ५८ यांच्या जागेमध्ये बांधण्यात आलेल्या जागेचा वापर कार्यालयासाठी केला जात असल्याची तक्रार केली होती. ही जागा निष्कासित करून मोकळी करण्यासाठी निर्देश म्हाडा अधिकाऱ्यांनी १० दिवसांची मुदत दिली होती. दरम्यान, या प्रकरणी काय कारवाई केली, असा प्रश्न सोमय्या यांनी विचारला आहे. तसेच पत्रातील माहिती चुकीची असल्यास स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.