कंगनाचे २ कोटींचे नुकसान ; महापालिकेवर गुन्हा दाखल करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Sep-2020
Total Views |

kangana_1  H x
मुंबई : बुधवारी मुंबई महानगपालिकेने कंगना रनौत यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड केली. याची पाहणी करण्यासाठी आज ती कार्यालयात गेली. कंगनाने कार्यालयातील तोडफोडीमुळे भावुक झाली. तोडफोडीमुळे कंगनाच्या कार्यालयाचे २ कोटींचे नुकसान झाले आहे. कंगना तिची बहीण आणि मॅनेजर रांगोली चंदेल यांच्यासह कार्यालयातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पोहोचले. कंगनाने तिच्या ऑफिसच्या पहिल्या मजल्याची पाहणी केली. ड्रिलिंग मशीनमुळे झालेल्या तोडफोडीमुळे कंगनाच्या कार्यालयाचा पायाला धक्का लागल्याचेही कळते. कंगनाला आपले ऑफिस पाहून खूप वाईट वाटले. १० मिनिटांसाठी तीने आपल्या कार्यालयाचा आढावा घेतला आणि ती तेथून निघून गेली.

मुंबई उच्च न्यायालयाने कंगना रनौत यांच्या कार्यालयात झालेल्या तोडफोडीच्या कारवाईबाबत सुनावणीसाठी २२ सप्टेंबरची तारीख दिली आहे. या सुनावणीदरम्यान मुंबई महापालिकेचे वकील म्हणाले की, कोर्टाच्या आदेशानंतर पालिकेने सर्व कामे थांबविण्यात आली आहेत. त्याचवेळी कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी म्हणाले की, अनेक तथ्य रेकॉर्डवर आणण्याची गरज आहे. माझी क्लायंट नुकतीच मुंबईत आली आहे म्हणून मला फाईल तयार करण्यासाठी वेळ हवा आहे.तसेच कंगनाने उच्च न्यायालयात बीएमसीने बेकायदा कारवाई केल्याचे अॅफिडेव्हीट दिले आहे. बीएमसी अधिकाऱ्यांच्याविरोधात कारवाई करणार असे तिचे म्हणणे आहे.

कंगना यांचे वकील सिद्दीकी यांनी हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, कंगनाच्या कार्यालयात पाणी आणि वीज नाही. पालिकेच्या वकिलांनी उत्तर देण्यासाठी कोर्टाला ३ ते ४ दिवसांची मुदत मागितली होती. यामुळे कोर्टाने पुढील सुनावणीसाठी २२ सप्टेंबरची तारीख दिली आहे. तसेच २२ सप्टेंबरपर्यंत कंगनाच्या कार्यालयावर कोणतीही कारवाई होणार नसल्याचेही सांगितले. त्याचबरोबर कंगनच्या वकिलांनी म्हटले होते की कंगना यासर्व गोष्टींवरून खूप नाराज आहे. ते कार्यालय म्हणजे तिचा स्वप्न महल होता. पण, कंगना एक सामर्थ्यवान स्त्री आहे. एखाद्याच्या सांगण्यावरून बीएमसीने हे बेकायदेशीर पाऊल उचलले असल्याचेही वकिलाने म्हटले आहे. मनपाच्या कारवाईत कंगणाच्या कार्यालयाचे एकूण २ कोटींचे नुकसान झाले आहे.
@@AUTHORINFO_V1@@