संपूर्ण मुंबई 'अधिकृत' आहे का ? : केदार शिंदेंचा पालिकेला प्रश्न

10 Sep 2020 14:15:43
Kedar Shinde_1  
 

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईविरोधात दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आवाज उठवला आहे. राजकारण करा पण कोणत्याही बाजूने सुडाचे नको, अशी प्रतिक्रीया त्यांनी या प्रकरणावर दिली आहे. 'जे घडलं ते अत्यंत चुकीचं! निंदनीय! या मुंबईमध्ये मी जन्मलो. ही आडवी तिडवी वाढली ती पुर्ण अधिकृत आहे? वर्षानुवर्षे अडचणी जाणवतात. त्याला जबाबदार कोण?
 
 
मुंबई महापालिकेने मनावर घेतले तर यापूर्वी असंख्या ठिकाणी जेसीबी चालले असते, राजकारण करा परंतू ते कुठल्याही बाजूने सुडाचे राजकारण होता कामा नये, त्यात सामान्य माणूस मरतो, असा टोला त्यांनी या प्रकरणावरून लगावला आहे. तसेच कंगनाच्या कार्यालयात ज्यावेळी बेकायदा बांधकाम सुरू होते, तेव्हा कारवाई का झाली नाही, त्यावेळी डोळेझाक का करण्यात आली, तत्कालीन पालिका अधिकाऱ्यांनाही बडतर्फ करा, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.
  
 
 
 
कंगनाने ज्या प्रकारे मुंबईबद्दल वक्तव्य केले ते निषेधार्ह आहे, असेही शिंदे यांनी म्हटले. मात्र, ज्याप्रकारे कंगनाविषयक उद्गार खासदार संजय राऊत यांनी काढले तेही निषेधार्ह आहे, असे परखड मतही त्यांनी मांडले आहे. शिवरायांनी स्त्री आदर शिकवला त्यांचाही मान राखायला हवा, असेही ते म्हणाले. दरम्यान, कंगना रणौत प्रकरणी तसेच मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाई प्रकरणी कुठल्याही प्रकारे प्रतिक्रीया देऊ नये, अशा सूचना 'मातोश्री'वरून देण्यात आल्या होत्या. बुधवारी दुपारी कडेकोट बंदोबस्तात शिवसेनेतर्फे सुरू असलेल्या आंदोलकांना चकवा देत कंगना आपल्या घरी पोहोचली होती.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0