कंगनावर त्वरित कारवाई मात्र मनीष मल्होत्राला ७ दिवसांची मुदत

10 Sep 2020 15:28:28

kangana_1  H x



मुंबई :
बुधवारी मुंबई महानगरपालिकेने अभिनेत्री कंगना रनौत हिच्या मणिकर्णिका फिल्म्स कार्यालयाची 'बेकायदेशीर बांधकाम' ठरवत तोडफोड केली. यावरून मनपा व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सर्वत्र टीका होत आहे. याच महानगरपालिकेचा दुट्टपीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. ज्यादिवशी कंगनाला नोटीस पाठविली गेली होती त्याचवेळी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांनाही बेकायदा बांधकाम केल्याबद्दल नोटीस पाठविण्यात आली. मात्र नोटीसला उत्तर देण्यासाठी कंगनाला २४ तासांची मुदत देण्यात आली होती तर मनीष मल्होत्राला ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.



निवासी मालमत्ता अवैधपणे व्यावसायिक मालमत्तेत रूपांतरित केल्याबद्दल मुंबई महानगरपालिकेने फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. परंतु नोटीसला उत्तर देण्यासाठी त्याला ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. कंगनाचे कार्यालय आहे, त्याच पाली हिल भागात मनीष मल्होत्रा याचेही कार्यालय आहे. बीएमसीने मनीषला सात दिवसांची मुदत दिली असून सात दिवसांच्या आत नोटीसचे उत्तर देण्याचे बजावले आहे. मनीष मल्होत्राने अलीकडे आपल्या ऑफिसच्या फर्स्ट फ्लोरवर काही बदल केले होते. यापार्श्वभूमीवर बीएमसीने एमएमसी कायद्याच्या कलम ३४२ आणि ३४५ अन्वये मनिष मल्होत्राला नोटीस पाठवली आहे. बेकायदा बांधकाम का पाडले जाऊ नये, याचे स्पष्टीकरण याद्वारे मागवण्यात आले आहे. यावरील त्याचे स्पष्टीकरण असमाधानकारक असल्यास कलम ४७५अ अन्वये खटला चालवण्यास तो पात्र असल्याचे नोटिसमध्ये लिहिले आहे. महानगरपालिकेला कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईवरून मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. कोर्टाने ही कारवाई त्वरित थांबवण्याचे आदेश दिले. पण तोपर्यंत अभिनेत्रीचे संपूर्ण कार्यालय उद्ध्वस्त झाले. अभिनेत्रीने मुंबईला पोहोचताच तिच्या उध्वस्त झालेल्या ऑफिसचे अनेक व्हिडिओ शेअर केले आणि याला 'लोकशाहीची हत्या' असे म्हटले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही कंगनाच्या कार्यालयात केलेल्या कारवाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागाराशी चर्चा केली.




दरम्यान , मणिकर्णिका फिल्म्स या कार्यालयाची तोडफोड झाल्यानंतर गंभीर आरोप करून कंगनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढविला. कंगना नाराजी व्यक्त करत म्हणाली, 'उद्धव ठाकरे, तुम्हाला काय वाटते मुव्ही माफियांच्या इशाऱ्यावर माझे घर फोडून तुम्ही माझा सूड घेतला आहे. आज माझे घर तुटले आहे, उद्या तुमचा घमेंड तुटेल. वेळ एकसारखी नसते. काश्मिरी पंडितांबाबत काय घडेल हे आज मला कळले आहे. आज मी देशाला वचन देतो की, अयोध्याबरोबर काश्मीरवरही मी एक चित्रपट बनवणार आहे. उद्धव ठाकरे हे क्रौर्य आणि दहशत माझ्या बाबतीत घडले ते चांगले आहे कारण त्याचे काही अर्थ आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.' यानंतरही कंगना वारंवार ट्विट करून शिवसेना व उद्धव ठाकरेंवर टीका करते आहे.
Powered By Sangraha 9.0