महाराष्ट्राचा विकास व्हायचा असेल तर भाजपाचेच सरकार पाहिजे

09 Aug 2020 15:55:18

karnatka_1  H x
 


कर्नाटक :
महाराष्ट्राचा विकास व्हायचा असेल तर भाजपाचेच सरकार पाहिजे. तसेच कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर महाराष्ट्रात भाजपचे सरकार अस्तित्वात येईल, असा गौप्यस्फोट कर्नाटकच्या महिला व बालकल्याणमंत्री शशिकला जोल्ले यांनी केले.


महाराष्ट्रात ऑपरेशन कमळबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, त्यावर शशिकला जोल्ले म्हणाल्या की, सध्या कोरोनाचे संकट आहे, हे संकट दूर झाल्यावर राज्यात भाजपाचे सरकार निश्चित येईल. महाराष्ट्राचा विकास व्हायचा असेल तर भाजपाचेच सरकार पाहिजे असे त्यांनी सांगितले. शिरोळ येथील भाजपा नेते अनिल यादव यांच्या निवासस्थानी कर्नाटकच्या महिला व बालविकास मंत्री शशिकला जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले होते की, ऑक्टोबर-नोव्हेंबर सरकार पाडणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, सरकार पाडायचं तर आत्ताच पाडा, हे महाविकास आघाडीचे सरकार असले तरी याचे स्टेअरिंग माझ्या हातात आहे. मात्र, महाराष्ट्रात हे सरकार पाडण्याची भाजपाला गरज नाही, आमची लढाई कोरोनासोबत आहे, या परिस्थितीत सरकारचे अस्तित्व दिसत नाही, त्यामुळे सरकार पाडण्याचे आव्हान देण्याआधी सरकार चालवून दाखवावे असे प्रतिआव्हान देत सरकारमधील तिन्ही पक्षांचा एकमेकांशी संवाद नाही, त्यामुळे एकमेकांच्या भांडणातूनच हे सरकार स्वत:हून कोसळेल असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला होता.
Powered By Sangraha 9.0