राममंदिर भूमिपूजनावरून आपचा खोटारडेपणा उघड

08 Aug 2020 18:48:46

aap _1  H x W:



अयोध्या :
आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना सोशल मीडियावर खोटेपणाचे वक्तव्य चांगलेच भोवले आहे. भाजपला दलितविरोधी पक्ष असे म्हणत त्यांनी ट्विटरवर खोटे ट्विट केले. यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘संजय सिंह झूठा है' ट्रेंड होता. उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना बुधवारी (५ ऑगस्ट २०२०) रोजी दलित असल्याने अयोध्येतल्या रामजन्मभूमी कार्यक्रमाला बोलावले नाही असा दावा आप नेत्याने केला होता.


 


वास्तविक, हे खोटे आहे. त्याच दिवशी उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत म्हटले ट्विट केले होते की, "श्री रामजन्मभूमीच्या प्रांगणात आयोजित भूमिपूजन कार्यक्रमाच्या भव्य मंडपात मी या ऐतिहासिक दिवसाचा साक्षीदार आहे. हे माझे भाग्य आहे,आश्चर्यकारक आणि अलौकिक आनंद वाटत आहे."



aap _1  H x W:


मौर्य यांनी ५ ऑगस्ट रोजीच हे ट्विट केले होते. असे असूनही, ७ ऑगस्ट रोजी, संजय सिंह यांनी ट्विटरवर म्हंटले की, त्यांना एका दलित नेत्याने सांगितले की राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना राममंदिर भूमिपूजन कार्यक्रमात आमंत्रित केले नाही. कारण ते दलित आहेत आणि केशव प्रसाद मौर्य यांनाही त्याच कारणासाठी निमंत्रित केले गेले नाही. भाजपने असे का केले ? असा सवाल त्यांनी केला. भाजपला दलितांना मंदिराबाहेर ठेवण्याची इच्छा आहे, असा आरोप त्यांनी केला. केशव प्रसाद मौर्य हे दलित असल्याचेही संजय सिंह चुकीचे सांगितले. ते ओबीसी समाजातील आहेत. ते प्रदेशाध्यक्ष होताच भाजपला उत्तर प्रदेशात पूर्ण बहुमताने विजय मिळाला आणि त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री बनविण्यात आले. रा.स्व. संघात दाखल होताच ते राममंदिर आणि अयोध्या चळवळीत सहभागी झाले. हे देखील जाणून घेण्यासारखे आहे की, भूमिपूजनामध्ये यजमान म्हणून प्रमुख भूमिकेत भाग घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील ओबीसी समाजातील आहेत. असे असूनही संजय सिंग यांनी केशव मौर्य यांना दलित म्हटले आणि भूमिपूजनासाठी बोलावले गेले नाही असेही सांगितले.


Powered By Sangraha 9.0