सुशांतच्या विम्याच्या पैशांसाठी त्याचे कुटुंब खोटे आरोप करत आहे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2020
Total Views |
sushant_1  H x

रिया चक्रवर्तीचा सुशांतच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप


मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या बँक खात्यातून १५ कोटी रुपये हडपल्याप्रकरणी ईडीने रिया चक्रवर्तीची शुक्रवारी जवळजवळ साडेआठ तास चौकशी केली. सुरुवातीला रियाने तपासात सहकार्य केले नाही. कधी ती आजाराचे निमित्त बनवत होती, तर कधी प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरे देत होती. सुशांतच्या खात्यातून पैसे काढल्याचा आरोप खोटा असल्याचे तिने म्हटले आहे. आतापर्यंत आपण ७ चित्रपट केले असून, त्यातून बराच पैसा कमावल्याचे रियाने चौकशीत म्हटले आहे.


ईडीच्या चौकशीत रियाने सुशांतच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले. तिचा दावा आहे की, सुशांतचे कुटुंबीय त्याचा विमा व इतर मालमत्ता मिळवण्यासाठी दबाव आणत होते. सुशांतचे कुटुंब त्याला तिच्यापासून वेगळे होण्यापासून सुशांतवर दबाव आणत होते. यासाठी सुशांतचे आयपीएस भावोजी कित्येक महिन्यांपासून एक मोठा कट रचत होते, असे रियाने या चौकशीत सांगितल्याचे सूत्रांकडून समजते. सुशांतने माझ्यावर जो खर्च केला तो स्वत:च्या मर्जीने काल असेही ती यावेळी म्हणाली.


ईडीने पाटणा पोलिसांकडून रिया आणि तिच्या कुटुंबीयांविरूद्ध दाखल एफआयआरची प्रत मागितली होती. याचा अभ्यास केल्यानंतर ईडीने मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. यानंतर ३१ जुलै रोजी ईडीने रिया, तिचे आईवडील, भाऊ, दोन सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.








@@AUTHORINFO_V1@@