केरळ विमान अपघातातील मृत व्यक्ती कोरोनाग्रस्त!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2020
Total Views |
keral_1  H x W:

बचावकार्यात सहभागी सर्वांची होणार कोरोना चाचणी!


केरळ : दुबईहून १९१ प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान केरळमधील कोझिकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरल्याने शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या दुर्घटनेतील मृतांची संख्या १९वर पोहोचली असून यात २ वैमानिकांचा समावेश आहे. तर १२६ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळील रुगणालयात उपचार सुरु आहेत. मृतांपैकी १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळुन आले आहे. यामुळे चिंतेत आणखीन भर पडली आहे.


केरळच्या आरोग्यमंत्री के. के.शैलजा यांनी या अपघातानंतर बचावकार्यात सहभाग घेतलेल्या सर्वांना स्वतःहुन क्वारंटाईन करुन घेण्यास सांगितले आहे. राज्य सरकारतर्फे सर्वांची कोरोना चाचणी होणार असल्याचे सुद्धा शैलजा यांनी सांगितले आहे.


या अपघाताविषयी आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसाअर, एयर इंडियाच्या आयएक्स १३४४ विमानाने संध्याकाळी दुबईहून उड्डाणास सुरुवात केली. हे विमान करीपूर विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरुन कोसळले आणि विमानाचे दोन तुकडे झाले. विमानात १८० प्रवासी आणि ६ क्रू सदस्य होते. जखमी प्रवाशांना मलप्पुरम आणि कोझिकोड जिल्ह्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले. २२ जणांना प्रथमोपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@