“वैमानिक दीपक साठेंच्या प्रसंगावधानामुळे वाचले अनेकांचे प्राण”

    दिनांक  08-Aug-2020 16:22:19
|

Deepak Sathe_1  
 
मुंबई : शुक्रवारी संध्याकाळी केरळमधील कोझिकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान धावपट्टी घसरले आणि विमानाचे अक्षरशः २ तुकडे झाले. १९१ प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या या विमाना अपघातात दुर्दैवाने मराठमोळे वैमानिक दीपक साठेंसह १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२३ प्रवासी जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे वैमानिक दीपक साठे यांच्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे प्राण वाचले, अशी माहिती त्यांचे भाऊ निलेश साठे यांनी भावनिक फेसबुक पोस्टद्वारे दिली.
 
 
 
 
 
 
निलेश साठे यांनी केलेल्या या भावनिक पोस्टमध्ये म्हंटले आहे की, “विमानाचे लँडिग गिअर काम करत नव्हते. इंधन संपावे म्हणून दीपक यांनी विमानतळाला तीन फेऱ्या मारल्या आणि विमानात असलेले इंधन संपवले. या विमानात इंधन नसल्यामुळेच त्याचा अपघात झाल्यानंतरही विमानाने पेट घेतला नाही. शिवाय विमानाचे उजव्या बाजूचे विंगदेखील तुटले होते. विमान खाली उतरवण्यासाठी विमानाचे इंजिन बंद केले. त्यानंतर तीनवेळा विमान आदळले. परंतु एवढा मोठा अपघात होऊनदेखील एअरक्राफ्टमध्ये आग लागली नाही. त्यांनी प्रसंगावधान राखत अनेकांचे प्राण वाचवले.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.