#Tweet4Bharat ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त व्हा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2020
Total Views |
MahaMTB_1  H x





मुंबई :
शॉर्ट ब्लॉगिंग साईट म्हणून ट्विटरची ओळख आहे. अशाच ट्विट थ्रेडच्या माध्यमातून लिखाण करणाऱ्या ब्लॉगर्सना व्यक्त होण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे #Tweet4Bharat या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यातील स्पर्धेसाठी स्पर्धक हिंदी, इंग्लिश किंवा मराठी या तीन भाषांचा उपयोग करू शकतो आणि आवडीच्या भाषेत व्यक्त होऊ शकता. या स्पर्धेत पुढीलपैकी एका किंवा अनेक विषयांवर ट्विट थ्रेड्स लिहायचे आहे. १. राष्ट्रीय एकात्मता, २. सामाजिक न्याय, ३. स्त्री-पुरुष समानता या तीन विषयांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेचा कालावधी १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट असा असेल. सर्व ट्विट्स तसेच त्यावर आलेल्या प्रतिक्रिया व रिट्विट यावरून स्पर्धेतील विजेते ठरविण्यात येतील.


१. ३ परीक्षक निवडीत पारितोषिकं (प्रत्येक विषयाकरिता एक )
२. ३ ट्विटराटी निवडीत पारितोषिकं (प्रत्येक विषयाकरिता एक )
३.३ सर्जनशील प्रस्तुतीकरण पारितोषिकं (प्रत्येक विषयाकरिता एक )
 


अशाप्रकारे तीन भाषांमध्ये मिळून एकूण २७ पारितोषिकं देण्यात येणार आहेत. १२ ऑगस्ट रोजी विजेत्यांची घोषणा करण्यात येईल. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक नगदी पारितोषिकांसोबतच एका उच्चस्तरिय राष्ट्रीय संमेलनामध्ये सहभागी होऊन त्यांचे विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. हे संमेलन स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १४ ऑगस्टला आयोजित करण्यात आले आहे. विजेत्यांसाठी लॉकडाऊन संपल्यानंतर रामभाऊ म्हाळगीं प्रबोधिनीच्या दोन दिवसांच्या भेटीचे नियोजन देखील करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात पाठवले जाईल. यातील ९ विजेते ट्विट हे मुंबई तरुण भारतमध्ये मराठी भाषेतील तर ऑप इंडिया यावर इंग्लिश व हिंदी भाषेतील ट्विट प्रकाशित होतील.



यामध्ये सहभागी सर्व स्पर्धकांना @iidlpgp हे ट्विटर हॅण्डल फॉलो करणे गरजेचे आहे. डायरेक्ट मेसेजचा पर्याय संपर्काकरिता खुला ठेवावा लागेल. तसेच, #Tweet4Bharat हा टॅग ट्विट थ्रेड मध्ये वापरणे गरजेचे आहे. एकच स्पर्धक वरती उल्लेखलेल्या पैकी एकापेक्षा अधिक भाषांमधुन आणि एकापेक्षा जास्त विषयांवर लिहू शकेल. ट्वीट थ्रेड मधे किमान ८ ट्वीट्स असावेत तर कमाल मर्यादा १५ ट्वीट्सची आहे. फक्त १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट दरम्यान केलेलीच ट्विट्स या स्पर्धेसाठी ग्राह्य असतील. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल व तो सर्व स्पर्धकांना बंधनकारक असेल.



tweet for bharat_1 &
@@AUTHORINFO_V1@@