भारत-अमेरिकेपाठोपाठ गुगलचाही चीनला दणका!

07 Aug 2020 13:29:19

Youtube_1  H x

अडीच हजारपेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल केले डिलीट!


कॅलिफोर्निया : गुगलने चीनविरुद्ध धडक कारवाई करत २५०० पेक्षा जास्त चिनी यूट्यूब चॅनेल डिलीट केले आहेत. या युट्यूब चॅनेलवरून दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात होती. ही माहिती मिळाल्यावर व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मने या चिनी युट्यूब चॅनेल्सविरुद्ध कारवाई केली.


चीनशी संबंधित सुरू असलेल्या चौकशीअंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे गुगलने माहिती देताना सांगितले. यूट्यूबच्या मते, सामान्यत: स्पॅम, राजकीय नसलेली माहिती या चॅनेलवर पोस्ट केली जात होती. परंतु, तरीही त्यांच्यात काही राजकीय समस्यांवर भाष्य केले जात होते. गुगलने या वाहिन्यांची नावे जाहीर केली नाहीत, परंतु अन्य काही माहिती दिली आहे. एप्रिलमध्ये डिसिफॉर्मेशन मोहिमेतील सोशल मीडिया अॅनालिटिक्स कंपनी ग्राफिकाने हा प्रकार समोर आणला होता. अमेरिकेच्या चिनी दूतावासाने अद्याप यावर प्रतिक्रिया दिली नाही. यापूर्वी, दिशाभूल करणारी आणि चुकीची माहिती पसरवण्याशी संबंधित सर्व आरोप चीनने पूर्णपणे नाकारले आहेत.


लडाखमध्ये हिंसक संघर्षानंतर भारताने चीनविरूद्ध कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे. भारताने आधी चीनमधील ५९ अॅपवर बंदी घातली. त्यानंतर पुन्हा ४७ अॅपवर बंदी घालण्यात आली. भारतानंतर अमेरिकेनेही धडक कारवाई करत टिकटॉक आणि व्हीचॅटसारख्या चायनीज अ‍ॅप्स वर बंदी घातली. आता गुगलनेही चीनविरूद्ध मोठी कारवाई केली आहे.



Powered By Sangraha 9.0