अखेर रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयात हजर!

07 Aug 2020 12:26:03
rhea_1  H x W:

आर्थिक व्यवहाराप्रकरणी संपूर्ण कुटुंबाची चौकशी होणार!


मुंबई : रिया चक्रवर्ती हिने ईडी कार्यालयात दाखल झाली असून तिचे रेकॉर्डिंग स्टेटमेंट घेतले जाणार आहे. तिने आपले स्टेटमेंट पुढे ढकलण्यात यावे असे ईडीला निवेदन केले होते. मात्र ईडीने ही याचिका फेटाळले असून तिला तात्काळ कार्यालयात हजर होण्याचे आदेश दिले होते.


सुशांत सिंह राजपूत प्रकरणी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती निर्दोष असल्यास तिने चौकशी दरम्यान पुरावे सादर करावे. तसेच या प्रकरणाची चौकशी नि:पक्षपातीपणे व्हावी आणि गुन्हेगार कोणीही असला तरीही त्याला सोडण्यात येऊ नये, अशी मागणी भाजप नेते आणि सुशांतचे जवळील नातेवाईक नीरजकुमार सिंह बबलू यांनी केली आहे.


सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आता सीबीआय आणि ईडी यांनी तपास सुरु केला आहे. या प्रकरणात ईडीने रिया चक्रवर्तीला ७ ऑगस्टला चौकशीसाठी बोलावले होते. परंतु, रियाने अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर होण्यास नकार दिला होता. सुप्रीम कोर्टातील सुनावणी संपेपर्यंत तिची इतर चौकशी होऊ नये, अशी मागणी रियाने केली होती. ईडीने रियाचे अपील नाकारत, तिला आजच हजर राहण्यास सांगितले, तसे न केल्यास आदेश धुडकावल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल असेही सांगितले.




Powered By Sangraha 9.0